आनंदाश्रम, जीवन संजीवन सेवा ट्रस्ट येथे १ ऑक्टोबर रोजी जेष्ठ नागरिक दिवस होणार साजरा.

आनंदाश्रम, जीवन संजीवन सेवा ट्रस्ट येथे १ ऑक्टोबर रोजी जेष्ठ नागरिक दिवस होणार साजरा.

सिंधुदुर्ग.

    समाज कल्याण कार्यालयामार्फत आनंदाश्रम, जीवन संजीवन सेवा ट्रस्ट, अणाव ता. कुडाळ येथे 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता जागतिक जेष्ठ नागरिक दिवस साजरा करण्यात येणार आहे.
   यावेळी जेष्ठ नागरिकाची आरोग्य तपसाणी करण्यात येणार आहे. तसेच जिल्हयातील स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय - निमशासकीय कार्यालये, नगर पंचायत, पंचायत समिती, नगरपरिषद, महाविद्यालये, शासकीय वसतिगृहे व आश्रमशाळा येथे साजरा करण्याबाबत संबंधित कार्यालयांना कळविण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक, विविध मान्यवर, नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या बिगर सरकारी संस्थाचे पदाधिकारी यांनी  मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे, आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.