अणसूर पाल हायस्कूलतर्फे सुमंगल परब यांचा सपत्नीक सन्मान
अणसूर पाल
अणसूर पाल विकास मंडळ, मुंबई संचलित अणसूर पाल हायस्कूल अणसूरच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित शालेय ध्वजारोहणप्रसंगी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे भारतीय नौदलासाठी विविध लढाऊ शिप्स, वाघशीर सबमरीन - पाणबुडी निर्मितीत आपले अमूल्य योगदान देवून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी देशसेवेचा आदर्श निर्माण करणारे श्री. सुमंगल सुरेश परब युटिलिटी हॅण्ड (२२१३४४) ईस्ट यार्ड सबमरीन विभाग यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला.श्री. सुमंगल परब यांनी भारतीय नौदलासाठी विविध लढाऊ शिप्स व सबमरीन उभारणीत आपले अमूल्य योगदान देवून देशसेवेचा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन अणसूर पाल हायस्कूलतर्फे त्यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला.यावेळी अणसूर पाल हायस्कूलचे सन २००४-२००५ माजी विद्यार्थी विकास परब व निळकंठ गावडे यांनी आपल्या बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांनी शाळाविकासासाठी जमविलेल्या रुपये ५१,०००/- (रुपये एकावन्न हजार)ची भरघोस देणगी शाळेला प्रदान केली. त्यांचे शाळा व संस्थेच्यावतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.यावेळी अणसूर पाल शालेय समिती चेअरमन श्री मातोंडकर एम.जी., मुख्याध्यापक राजेश घाटवळ, शिक्षकवृंद अक्षता पेडणेकर, विजय ठाकर, चारूता परब, संचिता परब आदी उपस्थित होते.

konkansamwad 
