आडेली येथील भरारी महिला प्रभाग संघाला वातानुकूलित प्रवासी व्हॅन
आडेली
आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून व सिंधुरत्न योजने अंतर्गत आडेली येथील भरारी महिला प्रभाग संघाला वातानुकूलित प्रवासी व्हॅन प्राप्त झाली आहे. या व्हॅनचे उदघाटन गुरुवारी आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीफळ वाढवून करण्यात आले. या व्हॅनसाठी शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी पाठपुरावा केला होता.यावेळी तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, शहरप्रमुख उमेश येरम, प्रीतम सावंत, समीर काळसेकर यांच्यासहित भरारी महिला प्रभाग संघाच्या वैभवी किशोर पोतदार, श्वेता निमिष चेंदवणकर, स्नेहल संदिप शेडगे, शिल्पा भरत मेस्त्री, धनश्री धनंजय गडेकर, अनिता अरुण धावडे, स्मिता निलेश गावडे, नम्रता विलास बोवलेकर, जान्हवी विक्रांत आईर, उन्नती उदय गावडे, वैभवी विजय गावडे, सुवर्णा सुभाष शेडगे, प्रियांका प्रशांत सावंत, सोनाली अरूण साळगावकर, भक्ति भुषण बांबार्डेकर आदी उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित सर्व महिलांनी आमदार दीपक केसरकर यांचे आभार व्यक्त केले.

konkansamwad 
