फ.रा.देसाई प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणा-या व्यक्ती व संस्थांचा सन्मान.

वेंगुर्ला.
फ.रा.देसाई प्रतिष्ठान आदर्श गाव केर यांच्या तर्फे दिला जाणारा स्मार्ट ग्राम पुरस्कार परुळेबाजार ग्रामपंचायतला
प्रदान करण्यात आला.माजी सरपंच प्रदीप प्रभु यांचा ही सन्मान करण्यात आला.आदर्शगाव केर दोडामार्ग येथील फ. रा.देसाई प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी विविध क्षेत्रातील उत्कृष्ट काम करणा-या व्यक्ती व संस्थांचा सन्मान करण्यात येतो.यावर्षी ग्रामपातळीवर विविध स्वच्छताविषयक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणारी परुळेबाजार ग्रामपंचायत व माजी सरपंच प्रदिप प्रभु यांना सन्मानीत करण्यात आले.
यावेळी नाथ-पै.सेवांगणचे ॲड.देवदत्त परुळेकर व भरत गावडे सदस्य शैक्षणिक सुकाणू समिती तसेच प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमानंद देसाई आदी उपस्थित होते.यावेळी उपक्रमशील शिक्षक माडाचीवाडी हायस्कूलचे दिपक सामंत यांनाही गौरविण्यात आले.यावेळी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला.यावेळी दशावतार कलेतील गुरू शिष्य परंपराला साजेशी गुरूपोर्णिमा कार्यक्रम संपन्न झाला.