प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते ध्वजवंदन
सिंधुदुर्गनगरी
प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे ध्वजवंदन समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. भारतीय संविधानामुळे देशाला लोकशाही, समता, स्वातंत्र्य आणि न्यायाची मूल्ये मिळाली असून प्रत्येक नागरिकाने संविधानाचा सन्मान ठेवून आपल्या कर्तव्यांचे प्रामाणिकपणे पालन करावे, असे त्यांनी सांगितले. या ध्वजारोहण समारंभास अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे, श्रीमती प्रतिभा वराळे, आरती देसाई, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले, जिल्हा कोषागार अधिकारी अमित मेश्राम, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, माविमचे नितीन काळे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

konkansamwad 
