तेरेखोल नदीने धोक्याची पातळी ओलांडली

तेरेखोल नदीने धोक्याची पातळी ओलांडली

 

सावंतवाडी

 

    रात्रभर सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे तेरेखोल नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदी दुथडी भरून वाहत असल्याने  बांदा शहरातील आळवाडी कट्टा कॉर्नर रस्ता पाण्याखाली गेला आहे. येथील दुकानातील सामान सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी स्थानिक पहाटेपासूनच सक्रिय आहेत. आळवाडी येथे भरणारा आठवडा बाजार कट्टा येथील उड्डाणपुलाच्या खाली बसविण्यात आला आहे. पावसाचा जोर वाढत असून प्रशासनाने आज रेड अलर्ट दिल्याने स्थानिकांना सतर्क रहण्याबाबत सूचना दिल्या आहेत.