पालकमंत्री नितेश राणे २० जुलै रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर

कणकवली
मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे रविवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार असून त्यांचा नियोजित दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे
सकाळी ०७.४५ वा. छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे आगमन व राखीव, सकाळी ०८.१५ वा. छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून विमानाने गोव्याकडे प्रयाण, सकाळी ०९.३० वा. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा, गोवा येथे आगमन व मोटारीने सिंधुदुर्गकडे प्रयाण, सकाळी १०.३० वा. कुडाळ तालुका भंडारी समाज मेळावा व विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यास उपस्थिती, दुपारी १२.०० ते ०४.०० पर्यंत, ओम गणेश निवासस्थान येथे जनतेच्या गाठीभेटी, सायं ०५.३० वा. कोकणसाद या दैनिकाचा ३६ वा. वर्धापन दिन व विशेषांक प्रकाशन सोहळयास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती, स्थळ हॉटेल अराध्या मुंबई-गोवा महामार्ग, नेमळे, सावंतवाडी असा दौरा राहणार आहे.