खासदार नारायण राणे १ जानेवारी रोजी सिंधुदुर्गात
कणकवली
माजी केंद्रीय मंत्री, खा. नारायण राणे नववर्षदिनी १ जानेवारी रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असून या दौऱ्यादरम्यान ते विविध स्थानिक कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. खा. नारायण राणे यांच्या नियोजित दौऱ्याप्रमाणे १ जानेवारी-गुरुवारी दुपारी १२ वा. मुंबई जुहू निवासस्थान येथून प्रयाण, दुपारी १२:३० वा. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टर्मिनल-१) वर आगमन, १:२५ वा. मुंबई विमानतळ येथून विमानाने गोवा - मोपा विमानतळाकडे प्रयाण, दुपारी २:४० वा. मोपा विमानतळ येथे आगमन, दुपारी २:५० वा. सिंधुदुर्ग सावंतवाडी मार्गे कणकवलीकडे प्रयाण, सायंकाळी ४:३० वा. ओम गणेश' निवास्थान कणकवली येथे आगमन आणी स्थानिक कार्यक्रमांना उपस्थिती असणार असल्याचे खा. नारायण राणे संपर्क कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

konkansamwad 
