वेंगुर्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दिवंगत अजितदादा पवार यांची जयंती साजरी

वेंगुर्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दिवंगत अजितदादा पवार यांची जयंती साजरी

 

वेंगुर्ला

 

       राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांची जयंती २२ जुलै रोजी वेंगुर्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अभिवादन करून साजरी करण्यात आली. राऊळवाडा येथील पेट्रोल पंपालगत असलेल्या पक्ष कार्यालयात दुपारी १२.३० वाजता हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.यावेळी अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी आदरांजली वाहिली. कार्यक्रमाला वेंगुर्ला तालुका अध्यक्ष संदीप पेडणेकर, जिल्हा उपाध्यक्ष सुशील चमनकर, तालुका सरचिटणीस संदीप सातार्डेकर, ओबीसी उपाध्यक्ष चंद्रशेखर मांजरेकर, युवा तालुका अध्यक्ष गजानन कुंभार, माजी उपसरपंच गणपत केळुस्कर, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश मोठे, श्याम नवार, शहर युवा नेते श्रेयस टाककर, सदगुरू गिरप, अंकुश मौर्य, ज्ञानेश्वर अनसुरकर, मालनकर, राजन आंबे, सर्वेश कुंभार यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी तालुकाध्यक्ष संदीप पेडणेकर यांनी अजितदादा पवार यांनी राज्याच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाचा तसेच त्यांच्या धडाकेबाज आणि प्रभावी प्रशासकीय कार्यशैलीचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांच्या कार्याचा आदर्श पुढील पिढीने घ्यावा, असे मतही त्यांनी व्यक्त केले.दरम्यान, राज्य शासनाने यंदापासून दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीचा अधिकृत शासकीय कार्यक्रमांच्या यादीत समावेश केल्यामुळे यंदाच्या जयंतीला विशेष महत्त्व प्राप्त झाल्याचे उपस्थितांनी सांगितले.