राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनविसेच्यावतीने कणकवली रुग्णालयात रुग्णांना फळेवाटप  

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनविसेच्यावतीने कणकवली रुग्णालयात रुग्णांना फळेवाटप  

कणकवली

 

     महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मराठी हृदयसम्राट राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे व बिस्किट वाटप करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला. रुग्णालयातील डॉक्टरांच्या हस्ते फळे व बिस्किट वाटपाला सुरुवात झाली. या उपक्रमाद्वारे रुग्णांना आरोग्यदायी आहार मिळावा आणि त्यांना लवकर बरे वाटावे हा उद्देश असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कणकवली-मालवण उपजिल्हा अध्यक्ष गणेश वाईरकर, तालुका अध्यक्ष शांताराम सादये, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिकेत तर्फे, देवेंद्र जाधव, अरविंद घाडी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.  मनसे व मनविसेच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णांशी संवाद साधत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांद्वारे जनसेवा करण्याचा मनसेचा प्रयत्न असल्याचे यावेळी सांगण्यात आले.