नारळी पौर्णिमा: कोळी बांधवांचा आनंद, समुद्राला कृतज्ञता

नारळी पौर्णिमा: कोळी बांधवांचा आनंद, समुद्राला कृतज्ञता

आषाढ शेवटला, श्रावण आणतो गोड वारा..
सागराच्या किनारी वाजती वाद्य नितनित सारा..
नारळी पौर्णिमा आली, शंखध्वनीने सोन झळाळे..
कोळी बांधव सजतात, पावसाचा नारळ वाहत निकाळे...
धारांच्या लाटा नाचती, जलदेवतेला अरुण वंदन..
सागराची जिव्हाळा, नमन तयाला सर्वांचे अर्पण...
दादा, भावांचे रक्षण, बहिण करते राखी बंध...
श्रावणात या पवित्र पाहू, नात्याचा स्नेहबंध....
कोळीण बाईच्या पदरात सांगतो, "धन्य या सणाचा दिवस"...
श्रद्धा– श्रमाचा हा मंत्र आहे, नारळी पौर्णिमेचा हा सुवर्ण स्पर्श...

 

        श्रावणातल्या पवित्र महिन्यात येणारी ही नारळी पौर्णिमा सागरशी पाडलेल्या आपुलकीची, निस्वार्थ भावनेचा आणि निसर्गपूजेचा एक अनोखा सण. महाराष्ट्रात विशेषतः कोकण किनारपट्टीवर, ह्या सणाला एक सुंदर, सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे. त्या दिवशी कोळी बांधव आपल्या नौका सजवून सागरात विखुरतात आणि मनोभावे समुद्राची पूजा करतात. त्यांच्या जीवनाचा आधार असलेला सागर–त्याला ते देवासारख मानतात. हे अस नात, आई आणि लेकरामधल असत, तस समुद्र आणि कोळी बांधवांमधल असत.नारळी पौर्णिमेचा हा दिवस समुद्रकिनाऱ्यावर आनंद उत्साहाने साजरा होतो. या दिवशी कोळी बांधव समुद्राला एक नवे नारळ अर्पण करतो, कारण नारळ–ज्याला "श्रीफल" असही म्हणतात. शुभ फळ मानले जाते, पांढरी कोरडी त्या आतील गोडसर पाणी दोन्ही तत्व शुद्ध व पावित्र्याचे प्रतीक आहे. म्हणूनच या दिवसाला "नारळी पौर्णिमा" अस नाव पडल. पुन्हा एकदा समुद्रात नौका घेऊन जाण्याआधी, कोळी बांधव आपल्या देवतेची–विशेषतः वरुणदेवाची पूजा करून आशीर्वाद मागतात. समुद्रात वादळ, अनपेक्षित बदल, यांचा सामना करत रोजचा जीवनधंदा करणाऱ्या ह्या लोकांच नात निसर्गाशी फारच खास आहे. त्या निमित्ताने आपल्याला निसर्गाशी असलेली नाळ पुन्हा जाणवते.कोळीण बायका रंगीबिरंगी साड्यांत, नखशिखांत पारंपारिक नृत्य सादर करतात. गाणी, वाद्य, नृत्य या सगळा किनारा न्हाऊन निघतो.पौर्णिमा ही राखी पौर्णिमा ही असते, बहिण भाऊ यांच्यातील प्रतीक म्हणजे राखी. आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्याची आणि सुख शांतीची प्रार्थना करते.हा सण आपल्या लोकसंस्कृतीचा आरसा आहे. श्रद्धा व श्रमांचा एकत्रित दर्शन यात घडून येत. ही केवळ एक धार्मिक परंपरा नाही, तर आपल्या कोळी बांधवांचा संस्कृतीचा श्वास आहे.