राष्ट्रीय महामार्गाच्या दयनीय अवस्थेबाबत ठाकरे शिवसेना वतीने ३० ऑक्टोंबर रोजी पदयात्रा. जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांची माहिती.

राष्ट्रीय महामार्गाच्या दयनीय अवस्थेबाबत ठाकरे शिवसेना वतीने ३० ऑक्टोंबर रोजी पदयात्रा.  जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांची माहिती.

कणकवली.

   जिल्हा अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. असे असताना कोणीही याकडे लक्ष देत नाही आहे. त्यामुळे प्रशासनाला जाग आणण्यासाठी ठाकरे शिवसेना मार्फत 30 ऑक्टोंबर रोजी गगनबावडा, करूळ, वैभववाडी, तळेरे येथील रस्त्याची पाहणी तसेच पदयात्रा काढण्यात येणार आहे. ही पदयात्रा करूळ घाटातून सकाळी सुरू होऊन तळेरे येथे सायंकाळी याची सांगता होणार असल्याची माहिती ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दिली.
   येथील विजय भवानी ते आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख नीलम पालव, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, युवा सेना तालुकाप्रमुख उत्तम लोके आदी उपस्थित होते. संदेश पारकर म्हणाले, गगनबावडा घाट रस्त्याच्या दुरवस्थे बाबत गणेशचतुर्थी पूर्वी शिवसेनेच्या वतीने आ. वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली तळेरे- वैभववाडी रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन छेडले होते. मात्र त्या आंदोलनाचा कोणताही परिणाम प्रशासनावर आणि संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांवर झालेला नाही त्यावेळी मात्र त्यांच्याकडून आश्वासने देण्यात आली.गणेश चतुर्थीच्या काळात जिल्ह्यात येणार्‍या चाकरमानी, पर्यटक, व्यापारी तसेच स्थानिक रहिवासी यांना खड्ड्यातूनच प्रवास करावा लागला. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा व्यापार हा भुईबावडा, फोंडा घाट आणि गगनबावडा घाट या तीन घाटांवर अवलंबून आहे. असं असतानाही गगनबावडा घाट मार्गाची दुरावस्था झाली आहे.
   डिसेंबर 2022 मध्ये गगनबावडा करूळ मार्गे तळेरे 21 किलोमीटरहून अधिक रस्त्याची टेंडर नोटीस झालेली आहे. त्यावेळीच जर रस्त्याच्या कामाची कारवाही झाली असती तर जनतेला आता चांगला रस्ता वाहतूकीस मिळाला असता. मात्र सुमारे एक वर्ष होत आले तरीही रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नाही. 250 कोटी रुपयांचा अंदाजे खर्च रस्ते दुरुस्तीसाठी होता. यासाठी चार कंपनीने टेंडर भरले. मात्र भवानी कस्ट्रक्शन कंपनीने 40 टक्के कमी दराने टेंडर घेतले असून गणेशचतुर्थी काळात खड्डे सुद्धा बुजवले नाही. आजही खड्डे दुरुस्ती अथवा डांबरीकरण चे काम सुरू केलेले नाही. 30 ऑक्टोबर पूर्वी रस्ता दुरुस्तीचे काम सुरू केले नाही तर आम्ही आंदोलनाची भूमिका घेणार आहोत. असा इशारा संदेश पारकर यांनी दिला.
   दिवाळी सण जवळ येत असून पर्यटन हंगाम सुरू होणार आहे. ऊस वाहतूक, गौण खनिज वाहतूक करूळ गगनबावडा मार्गे होत असते. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे जिल्ह्यात येणार्‍या पर्यटकांची संख्याही रोडावली आहे. पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्वाचा घाटमार्ग हा आहे. वाचनधारक आणि जनतेच्या मनातील प्रश्न हाती घेणार आहोत. यासाठी ठाकरे शिवसेनेने पदयात्रेद्वारे रस्त्याची पाहणी करण्याची अनोखी मोहीम हाती घेतली आहे. या पदयात्रेत आ. वैभव नाईक, विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, विधानसभा प्रमुख सतीश सावंत, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव यांच्यासह सर्व तालुकाप्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते या पदयात्रेत सामील होणार आहेत. अशी माहिती संदेश पारकर यांनी दिली.
   अतुल रावराणे म्हणाले, तयारी गगनबावडा रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे येतो या महामार्गाच्या दुरुस्तीसाठीचा ठेका 40 टक्के कमी दराने ठेकेदाराने घेतला आहे. म्हणजेच मुळात ही निविदा प्रक्रिया जास्त दराने लावण्यात आल्याचे सिद्ध होत आहे. 250 कोटींचे काम जर ठेकेदार 40 टक्के कमी दराने करत असेल तर नक्कीच ह्या टेंडर प्रक्रियेत घोळ आहे. ह्या अधिक दराने लावण्यात आलेल्या टेंडर प्रक्रियेची आम्ही चौकशी लावण्याची मागणी करणार आहोत. त्याचप्रमाणे जाग ठेकेदाराला काम देण्यात आले आहे तो व्यवस्थित काम करतो की नाही हे पाहण्यासाठी कमिटी तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.