अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भाजपच्या वतीने विविध कार्यक्रम

सिंधुदुर्ग
राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भाजपच्या वतीने जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे. या कार्यक्रमांच्या नियोजनासाठी २१ मे ला सकाळी ११ वाजता सिंधुदुर्गनगरी येथील वसंत स्मृती सभागृहात जिल्हा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात २१ ते ३१ मे या कालावधीत अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पालकमंत्री नितेश राणे आणि जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवले जाणार आहेत, अशी माहिती या अभियानाचे जिल्हा संयोजक प्रसन्न उर्फ बाळू देसाई यांनी दिली. या कार्यशाळेला महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रा. वर्षा भोसले-माने यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कार्यशाळेत भाजपाचे प्रदेश पदाधिकारी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, मोर्चा, आघाडी प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, जिल्हा व मंडळ समिती सदस्य, जिल्हा मोर्चा अध्यक्ष व सरचिटणीस, आघाडी, प्रकोष्ठ जिल्हा संयोजक, मंडळ अध्यक्ष आणि सर्व लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.