काशिराम राठवड संगीत भजन-गायन परीक्षेत सिंधुदुर्गातील प्रथम विशारद.
कुडाळ.
भारतीय संगीत कलापिठ केंद्रच्या संगीत भजन/गायन परीक्षेमध्ये काशिराम उर्फ सागर विलास राठवड (कड़ावल) यांनी सिंधुदुर्गातून प्रथम विशारद होण्याचा बहुमान मिळवला आहे. सत्र मे २०२४ मधून घेण्यात आलेल्या भारतीय संगीत कलापिठ केंद्रच्या सिंधुदुर्ग (SIN- 016) श्री जगन्नाथ संगीत विद्यालय केंद्रप्रमुख पखवाज अलंकार श्री महेश सावंत यांच्या केंद्रच्या वतीने घेण्यात येणाऱ्या संगीत परिक्षामधून भजन/ गायन या विषयात सिंधुदुर्गातून प्रथमच विशारद होण्याचा बहुमान आणि तोही A+ श्रेणीत उत्तीर्ण होण्याचा बहुमान श्री काशिराम उर्फ सागर विलास राठवड यांनी मिळविला आहे.
यावेळी बोलताना म्हणाले की आपल्या या यशामध्ये भजन शिक्षण गुरुवर्य सूर्यकांत भिलारे, कै.प्रमोद सुतार, बाबल सुतार, तसेच शास्त्रीय शिक्षण गुरुवर्य राजन माडये व संगीत अलंकार अजित गोसावी यांचे बहुमोल आपल्याला मार्गदर्शन लाभले त्यामुळे हा संगीतातील महत्वाचा टप्पा आपण यशस्वी करू शकलो, वयाच्या दहाव्या वर्षी पासुन संगीत क्षेत्रात पदार्पण करुन अनेक संगीत स्पर्धा तसेच भजन/गायन यामधून वैयक्तीक पारितोषिके पटकावली आहेत तसेच अनेक स्पर्धांना परीक्षण म्हणून सुद्धा कार्य आपण केलेले आहे. अनेक दिग्गज कलाकारांना हार्मोनियमची साथ उत्तम त्यांनी केलेली आहे. तसेच देवश्री संगीत विद्यालयाचे ते संचालक आहेत आणि जिल्ह्यामध्ये त्यांचे संगीत भजन, सुगम संगीत, शास्त्रीय संगीताचे वर्ग चालू आहेत तरी आपल्या या यशामध्ये आपले आईवडील यांचा आशीर्वाद व मार्गदर्शन यामुळे तसेच गुरुवर्यांच्या मार्गदर्शनाने व गुरुकृपेने आपल्याला हे यश मिळाले आहे असे ते यावेळी म्हणाले तसेच आपल्या सिंधुदुर्गातील भजनी बुवा तसेच गायक, तबला वादक, पखवाज वादक अशा सर्वांनी आपणही अशा प्रकारे संगीताचा अभ्यास करून परीक्षा द्याव्यात यासाठी पखवाज अलंकार श्री महेश सावंत (आंदुर्ले - कुडाळ) यांनी मोठे व्यासपीठ कालाकाराना उपलब्ध करून दिलेले आहे याचा अनेक कलाकारांनी लाभ घ्यावा व संगीत कलेत आपल्या सिंधुदुर्गला पुढे न्यावा अस त्यांनी यावेळी आवाहन केले आहे.