चिपी विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा; डीजीसीए पथकाकडून होणार तपासणी.

चिपी विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा; डीजीसीए पथकाकडून होणार तपासणी.

परुळे. 

   येथील चिपी विमानतळावरून नाईट लँडिंग विमान सेवा सुरू करण्यात येणार आहे. मात्र, तत्पूर्वी डीजीसीए कडून ग्रीन सिग्नल मिळणे अपेक्षित आहे. ४ डिसेंबर रोजी नौसेना दिनानिमित्त राष्ट्रपती,पंतप्रधान यांच्यासह महनीय व्यक्ती मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही सुविधा कार्यान्वितकरण्यात आली आहे. फ्लाय - 9 ही विमान कंपनी याठिकाणी विमानसेवा देण्यास सज्ज झाली आहे अशी माहीती विमानतळ प्रशासनाच्या सूत्रांनी दिली.
   सिंधुदुर्ग विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा सुरू करणे महत्त्वाचे होते. अखेर प्रशासकीय पातळीवर याबाबत ठोस निर्णय होवून आवश्यक त्या सुविधा पूर्ण करुन घेण्यासाठी विकासक आयआरबी कंपनीला सक्त सुचना देण्यात आल्या होत्या. जिल्हाधिकिरी किशोरतावडे यांनी सुध्दा याबाबत प्रत्यक्ष विमानतळाला भेट देऊन कंपनीला सुचना दिल्या होत्या.पालकमंत्री रविंद्र चव्हाण, खासदार विनायक राऊत यांनी सुध्दा याप्रश्नी पाठपुरावा केला होता. अखेर या विमानतळावर नाईट लँडिंगची यंत्रणा बसविण्यात आली आहे. लवकरच दिल्ली येथील डीजीसीएचे पथक या विमानतळावर येऊन सुविधेची तपासणी करूनही सेवा सुरू करण्यास अंतिम मंजुरी देणार आहे.