कुडाळ कुंभारवाडा प्रशालेत अभुतपूर्व शाळा पूर्वतयारी मेळावा उत्साहात संपन्न.

कुडाळ कुंभारवाडा प्रशालेत अभुतपूर्व शाळा पूर्वतयारी मेळावा उत्साहात संपन्न.

कुडाळ.

   पी.एम.श्री.जि.प.प्राथमिक शाळा कुडाळ कुंभारवाडा येथे शाळा पूर्वतयारी मेळावा उत्साहात संपन्न झाला.याप्रसंगी मुलांची रिमोटवरील चारचाकी गाडीतून ‌ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. शाळेच्या मुख्या.श्रीम.स्वप्नाली सावंत, शा.व्य. स.अध्यक्षा सुनिता अढाव व सर्व शिक्षकवृंद यांनी मुलांचे औक्षण केले. पुष्प देऊन विद्यार्थ्यांना त्यांच्या नावाचे कार्ड लावून केळी व लाडू  देऊन तोंड गोड केले. जिल्हा परिषदेचा गुढीपाडवा पटसंख्या वाढवा या उपक्रमाअंतर्गत मुलांच्या नावाची गुढी शाळेच्या पटांगणात उभारण्यात आली. अभुतपूर्व अशा स्वागत सोहळ्याने विद्यार्थी व पालक भारावून गेले.
    इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या मुलांची नाव नोंदणी करून शारीरिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक व भावनिक विकास, भाषा व गणनपूर्व तयारी याबाबत मुल्यांकन करून संबंधित पालकांना समुपदेशन करण्यात आले.माता पालक श्रीम.ममता मयेकर व रसिका सावंत यांनी आपले व पाल्याचे अनुभव मनोगतातून व्यक्त केले.प्राची आंगणे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी शा.व्यव.स.अध्यक्ष श्रीम.आढाव, उपाध्यक्ष श्री. पाटील,  शिक्षण तज्ञ श्री. राऊळ, ममता मयेकर, शा.व्य.स.सदस्य, माता पालक संघ सदस्य, शिक्षक पालक संघ सदस्य , अंगणवाडी सेविका, मुख्याध्यापक  स्वप्नाली सावंत, उपशिक्षक प्राची आंगणे, सायली कदम, गौरी गोसावी, चैताली पाटील, ऋतुजा गावडे, स्वराली लाड, रसिका सावंत जान्हवी केळबाईकर, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.