भोगवे गावची सुकन्या आराध्‍या मुंडये हिचे हिंदी ऑलंपियाड स्‍पर्धेत घवघवीत यश

भोगवे गावची सुकन्या आराध्‍या मुंडये हिचे हिंदी ऑलंपियाड स्‍पर्धेत घवघवीत यश


     भोगवे गावचे माजी सरंपच तथा विदयमान उपसरपंच श्री. रुपेश रामकृष्‍ण मुंडये यांची कन्‍या भोगवे गावची सुपुत्री कुमारी आराध्‍या रुपेश मुंडये हिने हिंदी ऑलंपियाड या स्‍पर्धेमध्‍ये प्रथम क्रमांकासह गोल्‍ड मेडल प्राप्‍त केले. आराध्‍या हि यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्‍कुल, सावंतवाडी ची विदयार्थीनी आहे. हिंदी विकास संस्‍थान दिल्‍ली व्‍दारा आयोजित या स्पर्धेत तिला यश मिळाल्याबद्दल तिचा दिल्‍ली येथे सत्‍कार करण्‍यात येणार आहे. 
      तिच्‍या या दैदिप्‍यमान यशाबद्दल आराध्‍या व तिचे आईवडील तसेच शिक्षकवृंद या  अभिनंदन केले जात आहे