म्हापण येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.

म्हापण येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.

 

वेंगुर्ला
 

     नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान सेवा पंधरवडा अंतर्गत व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा म्हापण विभाग भाजपयुवा मोर्चा वेंगुर्ले वतीने म्हापण ग्रामपंचायत सभागृहात मोफत नेत्र तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर व महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिराचे उद्घाटन माजी सभापती वंदना किनळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य गुरुनाथ मडवळ, माजी सभापती विकास गवंडे, सुदेश किनावडेकर, सिद्धेश मार्गी, विशाल वेंगुर्लेकर, प्रदीप गवंडे, राजू पावसकर, आबा कोचरेकर, डॉ.मंदार निळकंठ, डॉ.धनश्री गोविलकर, वैष्णवी पाटकर, रविंद्र सकरे, आर्यन मांजरेकर, ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग व म्हापण पंचक्रोशीतील तसेच निवती, खवणे, केळूस, कोचरे येथील लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होत.