प्रकाश कानूरकर यांचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मान.....उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मान....

मुंबई
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान समारंभ मुंबई येथे संपन्न झाला. यामध्ये वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा, मालवण येथील शिक्षक श्री. प्रकाश विठोबा कानूरकर यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सन्मानाच स्वरूप रोख रक्कम 1,10,000 रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे होते.हा सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ॲड राहुल नार्वेकर, मंत्री दादा भुसे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, मंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री आशिष शेलार, पंकज भोईर, अरविंद सावंत, जे. एम. अभ्यंकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. प्रकाश कानूरकर हे वराडकर हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाचा समाजकल्याण संचनालय पुणे मार्फत व्यसनमुक्ती अभियान राबवल्याबद्दल "युवा गौरव पुरस्कार 2001", ज्ञानदीप मंडळ सावंतवाडीमार्फत "ज्ञानदीप आदर्श शिक्षक पुरस्कार 2023", ग्लोबल वेलफेअर फाउंडेशन, (GMC, INDIA) मार्फत "नॅशनल एज्यूकेशनल एक्सेलन्स अवॉर्ड 2023", नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशन, बेळगावी मार्फत "राष्ट्रीय आदर्श शिक्षक कार्यकर्ता पुरस्कार 2022", माधवनगरच्या भ. रा. नाईक प्रतिष्ठान पुणेमार्फत "शिक्षण व्रती पुरस्कार 2024" अशा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच ते अनेक सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात कार्यरत देखील असतात.हा पुरस्कार मिळाल्याने कानूरकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.