दोडामार्ग तालुका पंचायत समिती आरक्षण जाहीर

दोडामार्ग तालुका पंचायत समिती आरक्षण जाहीर

 

दोडामार्ग

 

        दोडामार्ग तालुका पंचायत समितीचे आरक्षण आज तहसीलदार कार्यालयात जाहीर करण्यात आले. या आरक्षणानंतर बऱ्याच इच्छुकांचे मार्ग बंद झाले असले तरी, काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सभापतीपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले असून, कोनाळ, माटणे आणि झरेबांबर मतदारसंघातील विजयी उमेदवाराला सभापतीपदाची संधी मिळणार आहे. हे आरक्षण प्रभारी तहसीलदार प्रज्ञा राजमाने यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आले.

दोडामार्ग पंचायत समितीतील आरक्षण पुढील प्रमाणे आहे:

साटेली भेडशी – नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण)

झरेबांबर – सर्वसाधारण महिला

कोनाळ – सर्वसाधारण महिला

कोलझर – सर्वसाधारण महिला

माटणे – सर्वसाधारण

मणेरी – सर्वसाधारण प्रवर्ग

    सभापतीपदासह सर्व मतदारसंघांचे आरक्षण जाहीर झाल्याने पक्षांमध्ये राजकीय घडामोडींना गती प्राप्त झाली आहे. आपला उमेदवार निश्चित करण्यासाठी राजकीय पक्षांत जोरदार तयारी सुरू झाल्याचे दिसत आहे.