कोलगाव येथील सातेरी देवीचा ७ नोव्हेंबरला वार्षिक जत्रोत्सव

कोलगाव येथील सातेरी देवीचा ७ नोव्हेंबरला वार्षिक जत्रोत्सव

 

सावंतवाडी

 

    सावंतवाडी कोलगाव येथील प्रसिद्ध श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव ७ नोव्हेंबरला उत्साहात साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देवीची ओटी भरणे, नवस फेडणे आदी कार्यक्रम दिवसभर सुरु राहतील. रात्री मानकरी चंदन धुरी यांच्या निवासस्थानी असलेल्या मांड ते मंदिर अशी देवीची पालखीची मिरवणूक ढोल ताशाच्या गजरात, फटाक्यांची आतषबाजी करत काढली जाईल. त्यानंतर पौराणिक कथेवर आधारीत दशावतार नाट्यप्रयोग सादर करण्यात येईल. जत्रोत्सवानिम्मित संपूर्ण मंदिर आणि परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. तरी सर्व भाविकांनी जत्रोत्सवास उपस्थित रहावे, असे आवाहन देवस्थान उपसमितीने केले आहे.