परुळे मांजार्डेवाडी येथे १८ ते २१ एप्रिल दरम्यान श्री भगवती देवी नूतन मूर्ती प्रतिष्ठापन सोहळा

परुळे मांजार्डेवाडी येथे १८ ते २१ एप्रिल दरम्यान श्री भगवती देवी नूतन मूर्ती प्रतिष्ठापन सोहळा

 


वेंगुर्ला

 

     श्री भगवती देवी मंदिर मांजार्डेवाडी परुळे येथे नूतन मूर्ती प्रतिष्ठापन सोहळा चैत्र कृष्ण पंचमी ते अष्टमी शके १९४७, शुक्रवार दिनांक १८ एप्रिल ते सोमवार २१ एप्रिल या कालावधीत साजरा होणार आहे.श्री देवी भगवती देवी नूतन मूर्ती प्रतिष्ठापन सोहळा निमित्त शुक्रवार १८ एप्रिल रोजी दुपारी २.३० वा. मंगलाचरण, प्रायचित्त विधी, विष्णु पूजन, विष्णु श्राद्ध पंचगव्य होम, प्रायचित्त उत्तरांग हा कार्यक्रम सायं.५ वा. श्री भगवती आईच्या नूतन मूर्तीचे सहवाद्य मिरवणुकीने आगमन, शनिवार १९ एप्रिल रोजी सकाळी ७ वा. मंगलाचरण, देवतांना निमंत्रण, गणेश पूजा, पुण्याहवाचन, आचार्य कर्म, प्राकार शुद्धी, शांती होम, मंडप प्रतिष्ठा, गंगा पूजन, जलाधिवास, कर्म समाप्ती कार्यक्रम, दुपारी.३.३० वा. ऐच्छिक गायन सेवा, सायं.५वा.विद्यावाचस्पती, ह.भ.प. डॉ.अवंतिका ताई टोळे, पुणे यांचे सुश्राव्य कीर्तन सेवा कार्यक्रम, रात्रौ ८वा. राम कृष्ण हरी महिला भजन सेवा संघ तेंडोल यांची भजन सेवा, रविवार २० एप्रिल रोजी सकाळी ७ वा. मंगलाचरण, देवतेचा स्नानविधी, धान्यधिवास, ब्राह्मादिमंडलादि देवतांची स्थापना, अग्नि स्थापना, वास्तू होम, ग्रह होम, प्रधान हवण, कर्म समाप्ती, दुपारी ३.३० वा. ऐच्छिक गायन सेवा कार्यक्रम, सायं.५वा. ह.भ.प.श्री. अभय बुवा घांगरेकर, मुंबई यांची सुश्राव्य कीर्तन सेवा.रात्रौ.८वा. मुंडयेवस प्रासादिक भजन मंडळ शेळके बुवा श्री. उमेश मुंडे यांची भजन सेवा, सोमवार २१ एप्रिल रोजी सकाळी ७वा. मंगलाचरण, सकाळी ८.२८ मि. या मुहूर्तावर कुलस्वामिनी जगदंबा श्री भगवती आईच्या नूतन मूर्तीची प्रतिष्ठापना, प्राणप्रतिष्ठा, तत्त्वन्यास, श्री भगवती आईची महापुजा, बलिदान, महापुर्णाहुती, उत्तरांग कर्म, महाआरती, गा गाराणे, महानैवेद्य, कर्म समाप्ती कार्यक्रम होणार आहेत. दुपारी १ वा.श्री.देवी भगवती देवीचे दर्शन आणि भाविक भक्तांना महाप्रसादाचा कार्यक्रम, सायं.४.३० वा.ह.भ.प. सौ. संध्याताई पाठक सांगली हरिपूर यांची सुश्राव्य कीर्तन सेवा, रात्रौ ८वा. मामा मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळ यांचा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तरी या सोहळ्याचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन श्री.देव आदिनारायण देवस्थान परुळे यांच्यावतीने करण्यात आले आहे. तसेच या सोहळ्यासाठी प्रत्यक्ष आणि उपस्थित राहू इच्छिणाऱ्यांसाठी राहण्याची व्यवस्था उपलब्ध आहे या सोहळ्यासाठी आर्थिक तसेच वस्तू रुपी देणगी देण्यासाठी खालील बँक खात्याचा तपशील देण्यात आला आहे.

SHRI DEVI BHAGWATI DEVASTHAN
A/N20173211823
IFSC:MAHB0000508
BANK Name: Maharashtra Bank, Branch:Parule तसेच कोणत्याही प्रकारची ऑफलाइन पेमेंट केल्यास खालील क्रमांकावर तपशील कळवावा 
सचिन दामोदर देसाई (अध्यक्ष)- मो.नं. ९५१८५१३१३३
मकरंद अनंत देसाई  (सचिव)- मो.नं. ८२७५६७२०६५