होळीनिमित्त देवगड येथे श्री देव रामेश्वर देवस्थान समितीकडून विविध कार्यक्रम

होळीनिमित्त देवगड येथे श्री देव रामेश्वर देवस्थान समितीकडून विविध कार्यक्रम

 


देवगड 


       मिठबाव, कातवण, आणि तांबळडेग श्री देव रामेश्वर देवस्थान समितीच्यावतीने सोमवार दि. 2 मार्च ते शनिवार दि. 7 मार्च 2026 या कालावधीमध्ये होळी पौर्णिमा वार्षिकोत्सव सोहळा पारंपारिक पद्धतीने मोठ्या दिमाखात संपन्न होणार आहे.


कार्यक्रमाची रूपरेखा

सोमवार दि. 2 मार्च 2026

- सकाळी 9 वा. गाव होळीसाठी सर्व बारा पाच मानकरी सर्वदेव सेवक गाव रयत यांनी वेळीच उपस्थित रहावे.
- दुपारी 2 ते सायं.7 वाजेपर्यंत (कल्पवृक्ष) माड तोडणे.
- होळी पौर्णिमा शुभमुहूर्तावर श्री देव रामेश्वर श्री देव रवळनाथ मंदिराजवळ माडाची होळी उभी करणे.
- होळ देवाचे पूजन, धूप घालण्यात येणार आहे.

मंगळवार दि. 3 मार्च ते शनिवार दि. 7 मार्च:

- सायं.7 ते 7.30 तरंग पूजा व होळदेवपूजन
- रात्रौ.8 वा. धूप घालण्यात येणार आहे.
- दररोज जागर करण्यात येणार आहे.

      या वार्षिक उत्सव सोहळ्यासाठी सर्व बारा पाच मानकरी, सर्व देवसेवक, सर्व गाव रयत यांनी उपस्थित रहावे असे आवाहन देवस्थान कमिटीकडून करण्यात आले आहे.