मानवता विकास परीषदेचे व रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांचा अध्यात्मिक दौरा संपन्न.

मानवता विकास परीषदेचे व रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांचा अध्यात्मिक दौरा संपन्न.

मालवण.

   मानवता विकास परीषदेचे अध्यक्ष व रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषदेचे संस्थापक तथा ज्येष्ठ  सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत सावंत व सहकारी यांचा व्यापक अध्यात्मिक दौरा संपन्न झाला.यामध्ये त्यांनी परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातल्या राष्ट्रसंत श्री पाचलेगांवकर महाराज यांच्या नैकोट वाडी मुक्तेश्वर आश्रमास भेट दिली व दर्शन घेतले. तसेच पाचलेगाव येथील मुक्तेश्वर आश्रम भेट देत प.पू. पाचलेगांवकर महाराजाच्या जन्मस्थानाला भेट व दर्शन घेतले. बीड, आंबेजोगाई, देवी शक्तीपीठ, परळी वैजनाथ ज्योतीर्लिंग येथेही त्यांनी दर्शन घेतले.
   श्रीकांत उर्फ बाळा सावंत यांनी राष्ट्रजागृतीच्या व जनजागृतीच्या कार्यास आशिर्वाद घेतले. या दौऱ्यावर श्रीकांत सावंत यांच्यासह उद्योजक श्री. दीपक परब ,श्री शाहू व अरुण चव्हाण आणि मानवता विकास परिषद चे कार्यकर्ते सोबत होते. या दरम्यान श्रीकांत सावंत यांच्या विविध चळवळीतील राज्यभरातील सहकारी व कार्यकर्ते यांनी त्यांची भेट घेतली. अध्यात्मिकतेच्या माध्यमातून कोकणामध्ये कशा पद्धतीने समाजसेवा करता येईल याबाबतचा अभ्यास सुद्धा या दौऱ्यामध्ये श्री श्रीकांत सावंत यांनी केला.
   या दौऱ्याबद्दल बोलताना श्रीकांत सावंत म्हणाले की राष्ट्रजागृती, जनजागृती आणि सामाजिक कार्य करताना आपली अध्यात्मिक बैठक अत्यंत महत्वाची असून ती आपल्या कार्याला सामर्थ्य देते.