वेंगुर्ला येथील पारंपारिक मच्छीमारांची जाळी खडकामध्ये अडकून मोठे नुकसान.

वेंगुर्ला येथील पारंपारिक मच्छीमारांची जाळी खडकामध्ये अडकून मोठे नुकसान.

वेंगुर्ला.

  येथील नवाबग समुद्रकिनारी पारंपारिक मासेमारी करण्यासाठी निघालेल्या होली क्रॉस रापण संघाची मासेमारीसाठी फेकण्यात आलेली जाळी (पाटे) खडकात अडकून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना काल दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली.
    या बाबत सविस्तर माहिती अशी की वेंगुर्ला उभादांडा सुखटणवाडी येथील होली क्रॉस रापण संघाची नौका ही पारंपारिक मासेमारी करण्यासाठी नवाबाग येथून दुपारी तीन वाजता निघाली.काही अंतरावर रापण मारण्यासाठी जाळी फेकण्यात आल्या नंतर समुद्रामध्ये अचानकपणे दक्षिण वारा सुरू होवून पाण्याचा प्रवाह बदलला व समुद्रामध्ये फेकलेली पारंपारिक जाळी पाण्याच्या प्रवाहामुळे सागर बंगल्याच्या पाठीमागे जाऊन खडकात अडकली.यामध्ये  ९४ जाळ्यांचे (पाटे)  अंदाजे १.५० लाखाचे नुकसान झाले असून होडीचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.
सदर घटनेमुळे उपजीविकेचे साधन असलेल्या ३० ते ३५ कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. तरी शासनाने योग्य ती दखल घेऊन लवकरात लवकर नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी होली क्रॉस रापण संघाकडून करण्यात आली.
   यावेळी वेंगुर्ला तालुका गाबित समाज खजिनदार जयंत मोंडकर, माशाचे होलसेल व्यापारी बाबी रेडकर, तसेच मच्छीमार बांधव उपस्थित होते.