वैभववाडी विकास मंचतर्फे विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

वैभववाडी
वैभववाडी तालुका विकास मंच आयोजित हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे, अर्जुन रावराणे विद्यालय, श्री जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल आणि कै. हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय, वैभववाडी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सदर कार्यक्रमात वैभववाडी तालुक्यातील १५ माध्यमिक शाळांतील १२५ विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सदर कार्यक्रमात वैभववाडी तालुक्याचे तहसीलदार सुर्यकांत पाटील, नायब तहसीलदार दिलीप पाटील, वैभववाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल, वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष तसेच माजी वित्त आणि बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. वैभववाडी नगरपंचायतचे मुख्याधिकारी प्रतिक थोरात, वैभववाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे, वैभववाडी नगरपंचायतचे आरोग्य व शिक्षण सभापती रोहन जयेंद्र रावराणे, माजी सभापती लक्ष्मीणराव रावराणे आणि वैभववाडी तालुका पत्रकार संघाचे प्रतिनिधी मारुती कांबळे हे मान्यवर उपस्थित होते.जयेंद्र रावराणे, सदानंद रावराणे, निलेश रावराणे यांनी सदर कार्यक्रमासाठी विनाशुल्क शाळेचा हॉल आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेतर्फे त्यांचे विशेष आभार मानण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुरेश भिवाजी पाटील, उपाध्यक्ष विठ्ठल तळेकर, उपाध्यक्ष संतोष पावसकर, सचिव चंद्रकांत रासम, खजिनदार सुभाष करपे, कार्याध्यक्ष विश्वनाथ पांचाळ, कार्याध्यक्ष योगेश आंब्रसकर, कायदेविषयक सल्लागार रमाकांत पाष्टे, कार्यवाह प्रवीण रासम, स्थानिक संपर्क प्रमुख नवलराज काळे तसेच विशेष सल्लागार सुरेश आडिवरेकर, रविंद्र गावडे, विश्वास पावसकर, महेश रावराणे, विशाल घाग, संतोष माने आदी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. व्ही. एस. मरळकर यांनी केले तर आभारप्रदर्शन मुख्याध्यापक बी. एस. नादकर यांनी केले. उपस्थित सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांना अल्पोपहार वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.