मोफत आरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा. सहायक धर्मादाय आयुक्त एम.एम.निकम यांचे आवाहन.

सिंधुदुर्ग.
सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णांलय आणि श्री. जय भवानी कला, क्रिडा मित्र मंडळ, ओरोस बु. सावंतवाडा, ता. कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. 21 ऑक्टोबर 2023 रोजी भवानी मंदीर, सावंतवाडा ओरोस येथे सकाळी 9 ते 4 यावेळेत मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आला आहे. या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक धर्मादाय आयुक्त एम.एम. निकम यांनी केले आहे.