वैभववाडीत एस टी गटारात कलंडून अपघात

वैभववाडीत एस टी गटारात कलंडून अपघात

 

 

वैभववाडी

 

        
      पणजी पुणे एस.टी बस समोरून येणाऱ्या वाहनाला साईड देताना घसरून गटारात कलंडून अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणाला दुखापत झाली नाही. बसचे किरकोळ नुकसान झाले. हा अपघात नाधवडे धरणानजीक घडला. तळेरे-कोल्हापुर राष्ट्रीय महामार्गावरील तळेरे-वैभववाडी रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे एका मार्गावरून वाहतूक सुरू आहे. कुडाळ आगाराची एसटी बस पणजीहून पुण्याच्या दिशेने निघाली होती. नाधवडे धरणानजीक येथील एसटी बस आली असता समोरून चारचाकी आली. तिला बाजू देत असताना एसटी चालकाने गाडी बाजूपट्टीवर घेतली. मात्र त्यावेळी गाडी घसरत जाऊन गटारात कलंडली. चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला. या अपघातात कोणालाही इजा झाली नाही. गाडीचे किरकोळ नुकसान झाले.