परुळे श्री देवी सातेरी मंदिरात ३ व ४ मे ला विविध धार्मिक कार्यक्रम

परुळे श्री देवी सातेरी मंदिरात ३ व ४ मे ला विविध धार्मिक कार्यक्रम

 

 

वेंगुर्ला

 

     श्री देवी सातेरी देवस्थान समिती परूळे यानिमित्ताने कार्यक्रम ३ मे ला सुश्राव्य भजन श्री देवी माऊली प्रासा.भजन मंडळ, वालावल सकाळी ७ ते ८ वा. मंगलवाद्य ८ ते १२ वा. पूजा व अभिषेक, सायं ४.०० वा. सुश्राव्य भजन श्री देवी माऊली प्रासा. भजन मंडळ, वालावल वालावल (बुवा : तेजस मयेकर) पुरस्कर्ते : अरूण मसुरकर, सायं. ७ ते ८ वा. सुश्राव्य भजन (बुवा श्रीशा प्रकाश राणे), ८ वा. बाल दशावतार नाट्यमंडळ, डिगस (महिला) यांचा महान पौराणिक नाट्यप्रयोग मधु कैटभ, ४ मे ला सकाळी ७ ते ८ वा. मंगलवादय, ८ ते ९ वा. पूजा व अभिषेक ९ ते ११ वा. श्री सत्यनारायण महापुजा,  १०.०० वा. ढोलपथक श्री आई माऊली ढोल पथक, चेंदवण, दुपारी १२.३० वा. महाआरती व तिर्थप्रसाद, दुपारी १ ते ३ वा. महाप्रसाद सायं. ४ ते ७ वा. सुस्वर भजन, श्री देव महापुरुष प्रासादिक भजन मंडळ भोगवे (बुवा : तुषार खुळे) पुरस्कर्ते अरूण मसुरकर, सायं. ७ ते ८ वा. पारंपरिक व आधुनिक फुगड्या सादरकर्ते श्री देव भैरव जोगेश्वरी फुगडी मंडळ, कुडाळ पुरस्कर्ते सौ. संजना करंगुटकर, रात्रौ ८ ते ९ वा. सांस्कृतिक कार्यक्रम, रात्रौ ९ वा. दत्तमाऊली दशावतार नाट्यमंडळ यांचा दणदणीत नाट्यप्रयोग होणार आहे भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देवी सातेरी देवस्थान, भरणी यांनी केले आहे.