चांदोशी येथे तीन दिवसीय विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास शिबीर संपन्न.

चांदोशी येथे तीन दिवसीय विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास शिबीर संपन्न.

देवगड.

   चांदोशी येथील श्री भवानी मंगल कार्यालय येथे नुकतेच तीन दिवसीय निवासी विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास शिबीर पार पडले. सेवा भारती कोकण प्रांत, सिंधुदुर्ग जिल्हा फिरती विज्ञान प्रयोगशाळा प्रकल्प देवगड यांनी सदर व्यक्तिमत्त्व विकास शिबीर आयोजित करण्यात आले होते. या तीन दिवसीय निवासी शिबिरात देवगड तालुक्यातील १८ जि.प. शाळांतील ८८ मुली व ५६ मुलगे असे एकूण १४४ शिबिरार्थी पूर्णवेळ सहभागी झाले होते.
   या शिबिरामध्ये विज्ञान व राष्ट्रभक्ती या विषयांवर ९ बौद्धिक सत्रे व ४ शारीरिक सत्रे आयोजित करण्यात आली होती. या शिबिरात भारतमाता पूजनाचा विशेष लक्षवेधी कार्यक्रम पार पडला. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. श्री. किरण हिंदळेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.या शिबिरात आनंद राजम, शिबीर कार्यवाह, सुरेंद्र शर्मा, संघटन मंत्री, सेवा भारती कोकण प्रांत, आणि  हेमंतजी आईर प्रयोगशाळा विषय प्रमुख, सेवा भारती कोकण प्रांत हे पूर्णवेळ उपस्थित होते.
   या शिबिराला सेवा भारती कोकण प्रांत अध्यक्ष विलास तावडे, शिक्षण आयाम सेवा भारती कोकण प्रांत प्रमुख धनंजय जठार, कार्यवाह रा.स्व.संघ, देवगड तालुका महेशजी कानेटकर, माजी उपाध्यक्ष रा.स्व.संघ जनकल्याण समिती कोकण संभाग ॲड अजितराव गोगटे, यांनी भेट दिली. तसेच ४९ पालक, शिक्षक, हितचिंतक, देणगीदार यांनी सदिच्छा भेट दिली.हे यशस्वी पार पडण्यासाठी प्रयोगशाळा प्रकल्पाचे २७ माजी विद्यार्थी, प्रकल्प समिती सदस्य, जिल्हा समिती सदस्य यांनी परिश्रम घेतले.