लोणावळ्यातील भुशी डॅममध्ये पुण्यातील पाचजण बुडाले. दोघांचे मृतदेह मिळाले; तिघांचा शोध सुरू.

लोणावळ्यातील भुशी डॅममध्ये पुण्यातील पाचजण बुडाले.  दोघांचे मृतदेह मिळाले; तिघांचा शोध सुरू.

पुणे.

   लोणावळा येथील भुशी डॅम ओव्हर फ्लो झाला असून या धरणात वर्षा पर्यटनासाठी आलेले पुण्यातील पाचजण बुडाले असल्याची माहिती आहे. यातील दोन तरुणांचे मृतदेह सापडले असून तिघांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
   पुण्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. लोणावळ्यातील घाट परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. शनिवार आणि रविवार जोरदार पाऊस असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी झाली होती. येथील भुशी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. या धारणांच्या पायऱ्यावर हजारो पर्यटकांनी धरणाच्या पाण्यात आनंद लुटला. पुण्यातील सय्यद नगर येथील काही तरुण लोणावळ्यातील भुशी डॅम येथे वर्षा पर्यटनासाठी आले होते. या परिसरात मोठा पाऊस सुरू आहे. हे तरुण पोहण्यासाठी धरण परिसरात उतरले होते.
   यावेळी पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने हे तरुण धारण्याच्या बॅक वॉटरच्या पाण्यात बुडाले. धरणात तरुण बुडल्याची माहिती मिळताच पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे. स्थानिक पोलिसांनी पाण्यात शोध मोहीम राहून दोघांचे मृतदेह बाहेर काढले. तर तिघांचा शोध अद्याप सुरू आहे. बुडालेल्या पाच जणांची नावे समजू शकलेली नाही. लोणावळा परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. भुशी डॅम सह या परिसरातील अनेक धबधबे वाहू लागले आहे. पावसाचा आनंद घेण्यासाठी येथे जात असतांना काळजी घ्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.