देवरूख कनिष्ठ महाविद्यालय तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचा विजेता.

देवरूख कनिष्ठ महाविद्यालय तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचा विजेता.

देवरूख.

   देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या १९ वर्षाखालील मुलांच्या संघाने संगमेश्वर तालुका शालेय कबड्डी स्पर्धेचे अंतिम विजेतेपद प्राप्त करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध केली आहे. शिवाजी माध्यमिक विद्यालय, कोसुंब येथे तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा संपन्न झाल्या.
   देवरुख कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाने कसबा कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघावर मात करून अंतिम सामन्यात प्रवेश केला. अंतिम सामन्यात देवरुख महाविद्यालयाने दादासाहेब सरफरे कनिष्ठ महाविद्यालय, बुरंबीचा पराभव करून अंतिम विजेतपद प्राप्त केले. देवरुख महाविद्यालयाकडून उपकर्णधार श्रीदीप करंडे याने सर्वोत्तम खेळ करून संघाला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

 देवरुख महाविद्यालयाच्या संघातील खेळाडू पुढीलप्रमाणे-
    १. आदित्य कांगणे(कर्णधार), २. श्रीदीप करंडे (उपकर्णधार), ३. अनुष माईन, ४. आयुष पवार, ५. तेजस झेपले, ६. प्रणव कान्हेरे, ७. प्रणव सुवरे, ८. प्रथम घडशी, ९. यश रेवाळे, १०. वरद गुरव, ११. सुशांत माने, १२. हर्षित खाके. संघ व्यवस्थापक म्हणून प्रा.विजय मुंडेकर यांचे सहकार्य लाभले. या संघाला न्यू इंग्लिश स्कूल, देवरूखचे क्रीडाशिक्षक तानाजी कदम, महाविद्यालयाचे क्रीडाशिक्षक प्रा. सागर पवार यांचे मार्गदर्शन लाभले. संघातील यशस्वी खेळाडूंचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, ॲड.वेदा प्रभुदेसाई, प्राचार्य डॉ.नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, पर्यवेक्षक प्रा.एम. आर.लुंगसे, जिमखाना समन्वयक प्रा.सानिका भालेकर, प्रा. स्वप्नाली झेपले, प्रा.सुनील वैद्य आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.