प्राचार्य एम.आर.देसाई इंग्लीश मिडीयम स्कूलच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न.

वेंगुर्ला.
येथील प्राचार्य एम.आर.देसाई इंग्लीश मिडीयम स्कूलच्या इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केल्याबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई यांच्या हस्ते विद्यार्थी व पालकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कु.निधी सुहास पालकर ९३.६० टक्के, कु.चिन्मय नारायण पेडणेकर ९१.६० टक्के, कु.केतकी गोपाळ चेंदवणकर ८९.२० टक्के मिळाले.या प्रसंगी मा. दौलतराव देसाई व प्राचार्य डॉ.एम.बी.चौगले यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सदरचा कार्यक्रम बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाच्या जिमखाना विभागाच्या वतीने घेण्यात आला.
यावेळी बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.बी. चौगले प्राचार्य एम.आर. देसाई इंग्लीश मेडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. मिताली होडावडेकर, संस्था प्रतिनिधी श्री. सुरेंद्र चव्हाण, क्रिडा संचालक प्रा.जे.वाय.नाईक, वरीष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी व पालक उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते.