आनंदवाडी दक्षिणवाडा नवयुवक श्रीराम मित्रमंडळ आयोजित जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेत स्वरांगी खानोलकर, निधी खडपकर प्रथम.

देवगड.
आनंदवाडी दक्षिणवाडा येथील नवयुवक श्रीराम मित्रमंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेतील खुल्या गटात स्वरांगी खानोलकर (सावंतवाडी) हिने, तर लहान गटात कु.निधी खडपकर (सावंतवाडी) हिने प्रथम क्रमांक पटकाविला.स्पर्धेमध्ये एकूण ३० स्पर्धकांनी भाग घेतला होता. श्रीराम जन्मोत्सवानिमित्त मधुसुदन गावकर (मोर्वे) यांच्या स्मरणार्थ गावकर कुटुंबियांकडून ही स्पर्धा पुरस्कृत करण्यात आली होती.
बक्षीस वितरणप्रसंगी व्यासपीठावर उद्योजक द्विजकांत कोयंडे, प्रदीप प्रकाश कोयंडे, अंकुश मुणगेकर, अजित कोयंडे, कमलाकर मुणगेकर, प्रदीप शा.कोयंडे, भालचंद्र मुणगेकर, मंगेश कोयंडे, कुणाल कोयंडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन उत्तम मुणगेकर, नाना मुणगेकर यांनी केले. स्पर्धेतील खुल्या गटात द्वितीय क्रमांक विभागून समर्थ गवंडी (रेडी) व नेहा जाधव यांना, तृतीय क्रमांक कु.नंदिनी बिले (सावंतवाडी), चतुर्थ क्रमांक मृणाल सावंत (कुडाळ) हिने मिळविला. या गटात प्रथम व द्वितीय क्रमाकाला अनुक्रमे रोख पाच हजार रू.तीन हजार रू. तृतीय व चतुर्थ क्रमांकाला प्रत्येकी एक हजार रू. तसेच आकर्षक देण्यात आले.लहान गटात द्वितीय क्रमांक दिषभ परब (वेंगुर्ले), तृतीय क्रमांक कु. वीरा पारकर, चतुर्थ क्रमांक कु.साक्षी बाणे हिने मिळविला.या गटातील प्रथम, द्वितीय क्रमांकांना अनुक्रमे रोख तीन हजार रू.दोन हजार रू.तृतीय व चतुर्थ क्रमांकांना प्रत्येकी एक हजार रू.तसेच आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण सौ.प्रियांका बांदकर लाड व सौ. अनुजा गांधी यांनी काम पाहिले.