कणकवली येथे नगराध्यक्षपदासाठी ६ अर्ज दाखल.....नलावडे विरुद्ध पारकर लढत होणार रंगतदार
कणकवली
नगरपंचायत निवडणुकीतील नगराध्यक्षपदासाठी एकूण ६ जणांनी उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. यात संदेश पारकर यांचे दोन अर्ज तर समीर नलावडे (भाजप), गणेश राधाकृष्ण पारकर (लोकराज्य जनता पार्टी) तर गणेश सोनू हर्णे आणि सौरभ संदेश पारकर असे दोन अपक्ष अर्ज आहेत.
नगराध्यक्षपदासाठी सहा अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे खरी लढत भाजपचे समीर नलावडे आणि शहर विकास आघाडी तथा क्रांतीकारी विचार पक्षाचे संदेश पारकर यांच्यात होणार आहे. तर लोकराज्य जनता पार्टीचे उमेदवार गणेशप्रसाद राधाकृष्ण पारकर यांनीसुद्धा अर्ज भरला आहे. २१ नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. २६ रोजी उमेदवारांना चिन्ह वाटप होईल अशी माहिती तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे यांनी दिली.

konkansamwad 
