वेंगुर्लेत २७ सप्टेंबर रोजी श्रीदुर्गामाता दौड चे आयोजन

वेंगुर्लेत २७ सप्टेंबर रोजी श्रीदुर्गामाता दौड चे आयोजन

 

 

वेंगुर्ला

 

     श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान वेंगुर्ला व हिंदुधर्माभिमानी मंडळी वेंगुर्लातर्फे भारतमातेच्या कल्याणासाठी, देव, देश, धर्माच्या रक्षणासाठी श्रीदुर्गामाता दौडचे आयोजन केले आहे. ही दौड वेंगुर्ल्यात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली आहे. या दौडीचे मार्गक्रमण श्री रामेश्वर मंदिर-छत्रपती शिवाजी महाराज स्मारक माणिकचौक-शिरोडा नाका-शिवदुर्गा मित्रमंडळ दुर्गामाता(सुंदर भाटले)-मातोश्री कला क्रिडा मंडळ दुर्गामाता- बाजारपेठ-गाडीअड्डा मित्रमंडळ दुर्गामाता -मारुती स्टाॅप-रामेश्वर मंदिर असे होणार आहे. तसेच दौडीची सांगता झाल्यानंतर  श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाध्यक्ष मंगेश पाटील सर्व माताभगिनींना संबोधीत करतील.
       श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी गावोगावी हिंदूंना संघटित करून स्त्री शक्तीचा सन्मान आणि जागर करण्यासाठी श्री दुर्गामाता दौडचे आयोजन केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नवरात्री मंडळांनी आपापल्या गावात श्रीदुर्गामाता दौड काढावी व दौडचे नियोजन करण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांशी संपर्क करावा असे आवाहन धारकरी करत आहेत. सर्व माहितीसाठी जिल्हाध्यक्ष श्री मंगेश पाटील  94044 58417 यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.