उद्या कोकण रेल्वे मार्गावर सावर्डे ते रत्नागिरी दरम्यान अडीच तासांचा मेगा ब्लॉक. मंगला एक्स्प्रेससह लांब पल्ल्याच्या दोन एक्स्प्रेस गाड्यांचे वेळापत्रक कोलमडणार.

उद्या कोकण रेल्वे मार्गावर सावर्डे ते रत्नागिरी दरम्यान अडीच तासांचा मेगा ब्लॉक.  मंगला एक्स्प्रेससह लांब पल्ल्याच्या दोन एक्स्प्रेस गाड्यांचे वेळापत्रक कोलमडणार.

रत्नागिरी.

   कोकण रेल्वे मार्गावर देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी सावर्डे ते रत्नागिरी दरम्यान २३ फेब्रुवारी २०२४ रोजी अडीच तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या दिवशी मेगा ब्लॉक चालणाऱ्या भागातून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या दोन एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
  या संदर्भात कोकण रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार सावर्डे ते रत्नागिरी स्थानकादरम्यान  २३ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ७ ते ९.३० या यावेळेत अडीच तास मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे एर्नाकुलम ते हजरत निझामुद्दीन मंगला एक्स्प्रेस (१२६१७) ही . २२ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रवास होणारी दैनंदिन लांब पल्ल्याची गाडी मडगाव ते रत्नागिरी दरम्यान १ तास ४५ मिनिटे रोखून ठेवली जाणार आहे. तिरुनेलवेली ते गाधीधाम दरम्यान धावणार (२०९२३) ही २२ रोजी प्रवास सुरू होणारी आणि २३ फेब्रुवारीला मेगा ब्लॉक चालणाऱ्या भागातून जाणारी गाडी मडगाव ते रत्नागिरी दरम्यान १ तास १० मिनिटे थांबवून ठेवली जाणार आहे.