शिवसेनेकडून सावंतवाडी नगरपरिषदेच्या रिंगणात उतरलेल्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर
सावंतवाडी
शिवसेनेकडून नगरपरिषदेच्या रिंगणात उतरलेल्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यात नगराध्यक्ष पदाची संधी अॅड. निता कविटकर-सावंत यांना देण्यात आली आहे तर दोन माजी नगराध्यक्ष संजू परब व अनारोजीन लोबो यांच्यासह उत्कर्षा सासोलकर, शर्वरी धारगावकर, दिपाली सावंत, बाबू उर्फ खेमराज कुडतरकर, सुरेंद्र बांदेकर, गोविंद वाडकर या माजी नगरसेवकांना संधी देण्यात आली आहे तर बासित पडवेकर, वैभव म्हापसेकर, दुर्गेश उर्फ देव्या सूर्याजी, पूजा अरवारी, प्रसाद नाईक यांना संधी देण्यात आली.
शिवसेनेकडून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली. यात प्रभाग क्रमांक एक मधून हर्षा जाधव, बासीत पडवेकर, प्रभाग दोन मधून संजना पेडणेकर, खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, प्रभाग तीन मधून दिपाली सावंत, वैभव म्हापसेकर, प्रभाग चार मधून सायली दुभाषी, प्रसाद नाईक, प्रभाग पाच मधून उत्कर्षा सासोलकर, यशवंत उर्फ बंड्या कोरगावकर, प्रभाग सहा मधून शर्वरी धारगळकर, दुर्गेश उर्फ देव्या सूर्याजी, प्रभाग सात मधून स्नेहा नाईक, सच्चिदानंद उर्फ संजू परब, प्रभाग आठ मधून अनारोजीन लोबो, सुरेंद्र बांदेकर, प्रभाग नऊ मधून पूजा अरवारी, अजय गोंदावळे व प्रभाग दहा मधून वेदिका सावंत, गोविंद वाडकर यांना उमेदवारी देण्यान आली आहे.

konkansamwad 
