तुळस येथे ४ मे रोजी मोफत महाआरोग्य व नेत्र तपासणी शिबिर

तुळस येथे ४ मे रोजी मोफत महाआरोग्य व नेत्र तपासणी शिबिर
तुळस येथे ४ मे रोजी मोफत महाआरोग्य व नेत्र तपासणी शिबिर

 

 

वेंगुर्ला


 

      वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग आणि तुळस श्री देवी सातेरी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने, सीपीएए (CPAA) मुंबई व व्हिजन हॉस्पिटल गोवा यांच्या सहकार्याने मोफत महाआरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार, दि. ४ मे २०२५ रोजी सकाळी ८.३० ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत उत्सव मंगल कार्यालय, तुळस येथे भरविण्यात येणार आहे. या शिबिरात सीपीएए मुंबईचे तज्ञ डॉक्टर विविध तपासण्या करणार आहेत. यामध्ये जनरल सर्जरी, तोंडाच्या पोकळीची दृश्य तपासणी (बकल म्यूकोसा, कडक व मऊ टाळू, जीभ, जिन्जिव्हो-बकल सल्कस), तसेच डोके व मान तज्ज्ञांकडून कान-नाक-घशाची तपासणी केली जाणार आहे. तोंडाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग आणि स्तनाचा कर्करोग यासारख्या आजारांची तपासणीही करण्यात येईल. तसेच फिजीशियन तपासणी, प्राथमिक रक्त तपासणी, पॅप स्मियर चाचणी आणि पूर्ण शारीरिक तपासणी केली जाणार आहे. गरज असल्यास रेडिओलॉजिकल तपासणाही विनामूल्य केली जाईल. याशिवाय, व्हिजन हॉस्पिटल गोवा यांच्या वतीने नेत्ररोगतज्ज्ञांमार्फत डोळ्यांच्या आजारांची तपासणी केली जाणार आहे.

 

  • शिबिरात उपस्थित राहणारे तज्ञ डॉक्टर

डॉ. सतीश काणेकर – जनरल सर्जन
डॉ. संजय घील्डीयाल – नाक, कान, घसा तज्ञ
डॉ. वीणा बोरकर – फिजीशियन
डॉ. रचना मेहरा – स्त्रीरोग तज्ञ

तसेच सीपीएए संस्थेच्या कार्यकारी संचालक श्रीम. निता मोरे आणि सहसंचालिका श्रीम. मीनल परब यांच्या उपस्थित राहणार आहेत.

 

  • व्हिजन हॉस्पिटल, गोवा तर्फे उपस्थित राहणारे नेत्रतज्ज्ञ

वेंकटेश करीं – वरिष्ठ नेत्रतज्ज्ञ
शाहजहान शेख (मुस्कान) – नेत्रतज्ज्ञ
तेजस्वी बिचोलकर – सहाय्यक
करिश्मा कुंभारजुवेकर – सहाय्यक

 

  • अधिक माहितीसाठी संपर्क

श्री. विवेक तिरोडकर – ७७७५८२८५८८
सौ. सुजाता पडवळ – ९४२१२६८२३९
       
       सर्व नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन वेताळ प्रतिष्ठानचे सचिव प्रा. डॉ. सचिन परुळकर यांनी केले आहे.