भाजपच्या महारक्तदान शिबिरात १२६ दात्यांचे रक्तदान

वेंगुर्ले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपने वेंगुर्ल्यात आयोजित केलेल्या महारक्तदान शिविरात १२६ दात्यांनी रक्तदान करून मोदीप्रती कृतज्ञता व्यक्त केली भाजपतर्फे पंतप्रधानांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सेवा पंधरवडा साजरा केला जात आहे. याचाही शुभारंभ भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी व वें. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनंजय गोस्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत वेंगुर्लात करण्यात आला.खर्डेकर महाविद्यालयात आयोजित केलेल्या या कार्यक्रमास पावेळी व्यासपीठावर भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनंजय गोस्वामी,जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई , जेष्ठ नेते राजु राऊळ , वेंगुर्ले तालुका भाजप मंडळ अध्यक्ष विष्णू उर्फ पपू कुबल, जिल्हा उपाध्यक्ष अॅड. सुष्मा प्रमू-खानोलकर, वेंगुर्लाचे माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, जि.का.का.सदस्य सुहास गवंडळकर, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ, मच्छीमार नेते दादा केळुसकर, पदाधिकारी साईप्रसाद नाईक, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रणय वायंगणकर, पत्रकार महेंद्र मातोंडकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.देशाला जगात मानाचे स्थान देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले कार्य कधीही विसरता येणार नाही. देशातील १२० कोटीपेक्षा अधिक जनतेचा कुटुंबप्रमुख म्हणून मोदींनी प्रत्येकाचे आयुष्यमान उंचावेल, अशा योजना अमलात आणल्या आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात सेवा पंधरवडा साजरा करण्याची कल्पना भाजपने प्रत्यक्षात साकार केली आहे. त्याचाच माग म्हणून वेंगुर्लात आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान शिबिराला १२६ दात्यांनी रक्तदान करून मोदींच्या कार्याला सलाम केला आहे, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी वेंगुर्ले येथे केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस संपूर्ण देशभर साजरा होत आहे. आपल्या जिल्ख्धात पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा साजरा होत आहे. यानिमित्त ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक शक्तिकेंद्र स्तरावर विविधांगी समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपने हे कार्यक्रम नियोजनबद्ध राबविण्यासाठी कार्यशाळांचेही आयोजन केले होते. त्यामुळे नियोजित सर्व उपक्रम जनतेचे कल्याण लक्षात घेऊनच राबविले जातील. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आपल्या रक्तदानामुळे कोणला तरी जीवदान मिळणार आहे. अलिकडच्या काळात अपघात व विविध शस्त्रक्रियांचे प्रमाण वाढत आहे. अशावेळी रक्ताची मोठ्या प्रमाणावर गरज भासते. ही गरज मागविण्याच्या दृष्टीनेच वेंगुल्यात सेवा पंधरवड्याच्या शुभारंभाला महारक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. मोदींचा हा ७५ वा वाढदिवस असल्याने किमान ७५ जणांचे रक्तदान असे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, मात्र या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १०० हून अधिक जणांनी रक्तदान करून पंतप्रधानांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे, असे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी म्हणाले.सेवा पंधरवड्याचा संयोजक म्हणून आपल्यावर जबाबदारी सोपविण्यात आली तेव्हाच यावर्षीचा सेवा पंधरवडा यादगार करण्यासाठी आपण प्लॅनिंग केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाला वेगुर्त्यात भाजपतर्फे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ५५ दात्यांनी रक्तदान केले होते, पंतप्रधानांच्या वाढदिवसालाही महारक्तदान शिबीर घेऊन त्यांचा ७५ वा वाढदिवस असल्याने ७५ रक्तदात्यांकडून रक्तदान करवून घेण्याचे निश्चित केले होते. यासाठी भाजपच्या प्रत्येक कार्यकल्पनि कसून काम केले. रक्तदान चळवळीतील अग्रणी संस्था सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग-तुळस, भाजप युवा मोर्चा वेंगुर्ले, मेरा युवा भारत सिंधुदुर्ग, वें. खर्डेकर महाविद्यालयाचे एनएसएस व एनसीसी विभाग, आयटीआय वेंगुर्ले, लोकनेते दत्ता पाटील होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय, हॉस्पिटल नाका मित्रमंडळ, छत्रपती मित्रमंडळ कॅम्प वेंगुर्ले आदी संस्थांच्या सहकार्यामुळे हे शिबीर यशस्वी झाले, असे यावेळी बोलताना सेवा पंधरवड्धाचे संयोजक तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई म्हणाले.अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. धनंजय गोस्वामी यांनी भाजपच्या कार्याचे कौतुक करीत वै. खर्डेकर महाविद्यालयाचा सन्मान केल्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले. हे शिबीर यशस्वी होण्यासाठी वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे सचिव प्रा. डॉ. सचिन परुळकर, विधी नाईक, जान्हवी सावंत, चैताली निकम, प्रा. राम चव्हाण, प हेमंत गावडे, प्रा. सदाशिव सनगर, बापू वेंगुर्लेकर, धीरज आळवे, प्रथमेश देसाई, सानिया वराडकर, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे जिल्हा उपाध्यक्ष महेश राऊळ, तालुकाध्यक्ष आवा चिपकर, गोवा समन्वयक संजय पिळणकर, अलिस्टर ब्रिटो, अश्वेता माळकर आदींनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सचिन परुळकर यांनी केले.या कार्यक्रमाचे औचित्य साधून गेल्या अनेक वर्षांपासून वेंगुर्ल्यासारख्या छोट्या शहरात महाविद्यालयीन शिक्षणाची सेवा देणाऱ्या व बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचा यावेळी मानचिन्ह, सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. मुंबई विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट ग्रामीण महाविद्यालय हा पुरस्कार खर्डेकर महाविद्यालयाला प्राप्त झाल्याबद्दल हा सन्मान करण्यात आला. प्राचार्य डॉ. धनंजय गोस्वामी व स्थानिक संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण यांनी हा पुरस्कार भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्याकडून स्वीकारला.