वेंगुर्ल्यात महाराजस्व समाधान शिबिरांचे आयोजन

वेंगुर्ल्यात महाराजस्व समाधान शिबिरांचे आयोजन

 


वेंगुर्ले


   महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय १८ फेब्रुवारी, २०२६ अन्वये राज्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा-१ राबविण्यात येत आहे. याअंतर्गत वेंगुर्ले तालुक्यात मंडळ स्तरावर विविध ठिकाणी समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. वेंगुर्ले तालुकावासीयांनी या शिबिरात सहभाग घेऊन महसूल अंतर्गत विविध कामांची पूर्तता करून घ्यावी, असे आवाहन वेंगुर्ल्याचे तहसीलदार ओंकार ओतारी यांनी केले आहे.वेतोरे मंडळसाठी ७ मार्च रोजी सकाळी ११ ते ५ या वेळेत साई योगेश्वरी मंगल कार्यालय येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.शिरोडा मंडळ विभागासाठी १४ मार्च रोजी बा. म. गोगटे सभागृह, शिरोडा येथे सकाळी ११ ते ५ या वेळेत, १० एप्रिल म्हापण मंडळासाठी रोजी कोचरे येथील सिद्धी मंगल कार्यालयात सकाळी ११ ते ५ या वेळेत, मातोंड मंडळसाठी १७ एप्रिल रोजी शिवाजी हायस्कूल-तुळस येथे, तर वेंगुर्ले मंडळ व नगरपरिषद क्षेत्रासाठी ८ मे रोजी नाटककार मधुसुदन कालेलकर ११ ते ५ या वेळेत या शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.सभागृहात सकाळी तालुक्यातील नागरिक, शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार ओंकार ओतारी यांनी केले आहे.