वेंगुर्ल्याचे सुपुत्र किरण आरोलकर यांचा महाराष्ट्र समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मान.
वेंगुर्ला
ज्ञानसागर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित अतुल्य भारत प्रतिभा संमेलन सामाजिक बांधिलकीची जाणीव असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये वेंगुर्ला तालुक्यातील सध्या विरार येथे वास्तव्यास असलेले श्री किरण दत्तराम आरोलकर यांचा महाराष्ट्र समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. सुप्रसिद्ध अभिनेते श्री मिलिंद दास्ताने यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन समाज ऋण फेडत, सामाजिक बांधिलकीची जाणीव व भान ठेवून कार्य करीत असल्याने हा पुरस्कार देऊन श्री आरोलकर यांना सन्मानित करण्यात आले.