चौके येथील स्वयंभू भराडी देवीचा ११ नोव्हेंबर रोजी जत्रोत्सव
चौके
स्वयंभू व नवसाला पावणारी ग्रामदेवता श्री भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव कार्तिक कृष्ण सप्तमी, शुक्रवार दि. ११ नोव्हेंबर २०२५ रोजी मोठ्या भक्तीभावाने साजरा होणार आहे.
या जत्रोत्सवाच्या पारंपारिक कार्यक्रमांना सकाळी देवीची व इतर देवतांची पूजाअर्चा करून सुरुवात होईल. सकाळी दहा वाजता सर्व मानकरी व गावकरी मंदिरात जमा होतील. त्यानंतर इतर भाविकांकडून ओट्या भरण्याचा सोहळा दिवसभर सुरू राहील.
रात्री उशिरा देवीला धूप ओवाळून महाआरती व पालखी प्रदक्षिणा होईल. या वेळी देवीच्या जयघोषांनी आणि फटाक्यांच्या रोषणाईने चौके गाव उजळून निघेल.
जत्रोत्सवाच्या पारंपारिक सोहळ्याची सांगता चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळाच्या नाट्यप्रयोगाने होणार आहे.
भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री भराडी देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मानकरी व देवस्थान समितीने केले आहे.

konkansamwad 
