दाभोली इंग्लिश स्कूलच्या बांधावरची शाळा उपक्रमाला विद्यार्थी व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

वेंगुर्ला.
जय जवान जय किसान, शेतकरी राजाचा विजय असो अशा घोषणा देत शालेय विद्यार्थ्यांना शेतीचे व शेतकऱ्यांच्या कष्टाचे महत्व समजावे म्हणून वेंगुर्ला एज्युकेशन सोसायटी हीरक महोत्सव निमित्त दाभोली इंग्लिश स्कूल मध्ये शाळेच्या राष्ट्रीय हरित सेना, कोज् टू कनेक्ट मल्टी स्किल फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्या उत्स्फूर्त सहभागतून उपक्रम संपन्न झाला.
सर्वप्रथम शाळेचे मुख्याध्यापक किशोर सोन्सुरकर यांनी भाताचे बियाणे, रोप, ते पुन्हा तांदूळ अर्थात आपले अन्न धान्य हा प्रवास विद्यार्थ्यांना विषद केला.
यावेळी शाळेच्या जेष्ठ शिक्षिका सौ रेश्मा चोडणकर व मल्टी स्किल विभागचे प्रमुख प्रतीक्षा पोईपकर शेती पदविका धारक यांच्या हस्ते भात रोप पेंडीच पूजन करण्यात आले व पलखीपुजन करण्यात आले.भात रोप असलेली पालखी चे शाळा ते शेतीचा बांध अशी वाजत गाजत शेतकरी सन्मानार्थ घोषणा गाणी गात मिरवणूक काढण्यात आली.बांधा जवळ ग्रामस्थ यांच्या वतीने भात रोप पालखी चे स्वागत करण्यात आले.
भात रोप काढणी, रोप लावणी साठी शेत नांगरणे, चिखल समपातळीत करणे, रोप लावणी करणे या बाबत स्थानिक शेतकरी श्री गोलतकर यांनी माहिती दिली.सर्व विद्यार्थी सदर उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.लावणी झाल्यावर चिखलधुनी म्हणजेच विद्यार्थ्यांनी चिखलात विविध पारंपरिक खेळ सादर केले. बांधावरची पेज,भात बियाणे, रोप ते पुन्हा तांदूळ आणि त्या पासून बनणारी पारंपरिक पेज विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष बांधावर पेज शिजऊन आनंदात शिस्तबध्द पध्दतीने घेतली.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुधीर
गोलतकर यांनी सर्वांचे कौतुक करून शालेय विद्यार्थ्याना अश्या प्रकारे शेतीचे महत्व पटवून दिल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करून खाऊ वाटप केले. यांनतर शिक्षक दिपक पाटील व वसंत पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी तंत्र विभाग शिक्षक दत्तप्रसाद सांगेलकर, राजेश कांबळी, सोनाली कांदळगावकर, अबू मिषाले, सौ भारती गोलतकर व ग्रामस्थ उपस्थित होते.