सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना जि. प. मधून योजना मंजूर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना जि. प. मधून योजना मंजूर

 

सिंधुदुर्गनगरी 

 

       जि. प. 5% सेस मधून सिंधुदुर्ग जिह्यातील दिव्यांग बांधवांना योजनेतील तीन चाकी स्वयंचलित गाडी (ज्युपिटर) मंजूर झाली असून २७ लाभार्थ्यांना त्याचा  लाभ मिळणार आहे. तसेच  घरघंटी ३५ लाभार्थ्यांना, १५ लाभार्थ्यांना मोबाईल, २८ लाभार्थ्यांना घरकुल योजना मंजूर झालेली आहे. ही मंजुरी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे व समितीच्या माध्यमातून करण्यात आली. योजना मंजूर करतेवेळी दिव्यांग बांधवांना काही अडचणींचा सामना करावा लागला. ही बाब भाजप दिव्यांग विकास आघाडीचे जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे यांना समजताच त्यांनी तातडीने भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची भेट घेऊन सिंधुदुर्ग बँकचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या माध्यमातून अडचणीतील दिव्यांग बांधवांना कर्जपुरवठा करून त्यांच्या समस्या सोडवील्या. असे झाल्याने दिव्यांग बांधवांना दिलासा मिळाला आहे.भाजप दिव्यांग आघाडी सिंधुदुर्ग आणि दिव्यांग बांधवांच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, मुख्यकार्यकारी अधिकारी व संबंधित अधिकारी यांचे आभार मानण्यात आले.