वेंगुर्ल्यामध्ये आज भव्य तिरंगा पदयात्रा

वेंगुर्ल्यामध्ये आज भव्य तिरंगा पदयात्रा

 

वेंगुर्ला

 

       पेहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचे कंबरडे मोडले, पाकिस्तानला धडा शिकवत त्यांची जागा दाखवली. आपल्या अतुल्य पराक्रमाने भारतीय सैन्याने देशाची मान अभिमानाने उंचावली, यासाठी सैन्याचे मनोबल वाढावे  म्हणून आज म्हणजेच मंगळवार दिनांक २० मे रोजी संध्याकाळी ४ वाजता वेंगुर्ला दाभोली नाका ते रामेश्वर मंदिर अशी वेंगुर्ला शहरात तिरंगा पदयात्रा संपन्न होणार आहे. सर्व नागरिकांनी तिरंगा यात्रेत सहभागी होण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात येत आहे.