वेंगुर्ला शिवसेनेकडून विकास कामांची कार्यपुस्तिका प्रकाशित

वेंगुर्ला शिवसेनेकडून विकास कामांची कार्यपुस्तिका प्रकाशित

 

वेंगुर्ला
 

   वेंगुर्ले नगर परिषदेच्या निवडणूक प्रचारार्थ शिवसेनेच्या नगराध्यक्षांसह सर्व उमेदवारांनी दोन फेऱ्या पूर्ण केल्या आहेत. माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून सत्ता काळात आणि त्यानंतर न.प. मधील प्रशासक कालावधीमध्ये गेल्या साडेतीन-चार वर्षांमध्ये या शहरामध्ये आम्ही शिवसेना पक्षाच्या माध्यमातून जी विकासात्मक काम केली. ती लोकांना समजावी म्हणून विकास कामांची कार्यपुस्तिका प्रकाशित केली आहे.त्याचे प्रकाशन करत आहोत. आम्ही केलेली कामे लोकांच्या समोर ठेवणार आहोत अशी माहिती शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
       या पत्रकार परिषदेवेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नागेश उर्फ पिंटू गावडे, शिवसेना शहरप्रमुख तथा उमेदवार बुधाजी येरम, सुनील डूबळे तसेच सर्व शिवसेना उमेदवार व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. वेंगुर्ले शहरातील जी विकास काम अपुरी होती प्रशासक काळात त्या कामांचा पाठपुरावा केला आणि शासनाच्या माध्यमातून त्या कामांना निधी आणला. या सर्वांची सर्व माहिती त्या कार्यपुस्तकीमध्ये दिली आहे. शहरातील नागरिकांसमोर जाताना आम्ही केलेली कामे सांगून मत मागत आहोत. शिवसेनेच्या उमेदवारांना मोठ्या प्रतिसाद प्रचारामध्ये मिळत आहे. आमदार दीपक केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना सर्वांना बरोबर घेऊन आम्ही चालत आहोत. यावेळी बोलताना त्यांनी प्रत्येक प्रभागात केलेल्या विकास कामांची माहिती दिली.