आंबोली मान्सून मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५०० हुन अधिक स्पर्धकांचा सहभाग.

सावंतवाडी.
आंबोली सरपंच व सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू टीम तर्फे आयोजित करण्यात आलेल्या मान्सून मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.यात २१ किलोमीटर पुरुष गटातून सिद्धेश बारजे तर महिला गटातून दीपिका चौगुले विजेती ठरली तर ६ किलोमीटर १८ वर्षाखालील मुलांच्या गटातून ऋतिक वर्मा तर मुलींच्या गटातून आयुष्या राऊळ यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर १८ वर्षावरील पुरुष गटात ओंकार बायकर तर महिला गटात वैष्णवी चौधरी विजेते ठरले.
या मॅरेथॉन स्पर्धेचा शुभारंभ भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आंबोली रेस्क्यू टीमचे बाबल आल्मेडा, आंबोली सरपंच सावित्री पालेकर, ॲड.अनिल निरवडेकर, माजी नगरसेवक राजू बेग, सुधीर आडिवरेकर, माजी जि.प.सदस्य पंढरी राऊळ, संतोष पालेकर, दिलिप भालेकर, केतन आजगांवकर, उत्तम नार्वेकर, आंबोली ग्रा.पं. सदस्य छाया नार्वेकर, कोजमा डिसोजा, मायकल डिसोजा, दोडामार्ग येथील भाजपा पदाधिकारी रंगनाथ गवस, दोडामार्ग मिडियाचे शिरीश नाईक, मोरगाव सरपंच संतोष आईर, प्रविण गवस, अंकुश नाईक, सर्वेश पालकर, रविंद्र देसाई, दोडामार्ग तालुका कृषी आघाडी प्रमुख मनोहर देसाई, संजय उसपकर, जितू गावकर, विनायक ठाकूर, लायन्स क्लब अध्यक्ष अमेय पै, शक्ती केंद्र प्रमुख बंटी जामदार, मंदार पिळणकर, धिरेंद्र म्हापसेकर, बुथ अध्यक्ष विराग मडकईकर, अमित गवंडळकर, नागेश जगताप, आडेली सरपंच परेश हळदणकर, बोवलेकर सर, प्रशांत नाईक, साईप्रसाद नाईक, आबा एरम, राकेश धावडे, विष्णू कुबल, गणेश पडते, काका भिसे, प्रदिप जाधव, जोस्ना कर्पे, गजानन कर्पे, पुंडलीक कदम तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.