जम्मू-काश्मीरमध्ये बीएसएफ जवानांच्या बसला भीषण अपघात. ३ जवान शहीद; अनेकांची प्रकृती चिंताजनक.

जम्मू-काश्मीरमध्ये बीएसएफ जवानांच्या बसला भीषण अपघात.  ३ जवान शहीद; अनेकांची प्रकृती चिंताजनक.

श्रीनगर.

   जम्मू-काश्मीरमधील बडगाममध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. बीएसएफच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला. बस खोल दरीत कोसळल्यानं ही दुर्घटना घडली. या अपघातात बीएसएफचे ३ जवानांचा मृत्यू झाला आहे. तर ३६ जवान जखमी झाले आहेत. सहाजण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे.
   सध्या बचावकार्य सुरू असून जखमींवर तातडीनं उपचार करण्यासाठी वैद्यकीय पथकं अपघातस्थळी रवाना करण्यात आली. अपघाताच्या कारणाचा तपास अधिकारी करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, घटनास्थळी स्थानिक लोक उपस्थित होते. या अपघातात बीएसएफच्या 35 जवानांशिवाय बस चालकही जखमी झाला. जम्मू-काश्मीरमध्ये १८ सप्टेंबर रोजी पहिल्या टप्प्याचे मतदान संपन्न झाले. निवडमुकीसाठी जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्याचे मतदान आता २५ सप्टेंबर रोजी होणार आहे. २६ विधानसभा मतदारसंघात होणार असलेल्या मतदानासाठी ३६ जवानांची तुकडी रवाना होत होती. यावेळी बडगाव जिल्ह्यातील ब्रे गावानजीक दरीत कोसळून बसचा अपघात झाला.