दिवाणखवटी बोगद्यानजीक रेल्वे रूळावर माती; कोकण रेल्वेची वाहतुक विस्कळीत.

दिवाणखवटी बोगद्यानजीक रेल्वे रूळावर माती; कोकण रेल्वेची वाहतुक विस्कळीत.

रत्नागिरी.

   मुसळधार पाऊस पडत असल्याने कोकण रेल्वे मार्गावरील दिवाणखवटी येथील बोगद्यानजीक माती रूळावर आल्याने कोकण रेल्वेची वाहतुक विस्कळीत झाली आहे. यामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्या विविध स्थानकात थांबवून ठेवण्यात आल्या आहेत. मुंबईच्या दिशेने जाणारी मांडवी एक्स्प्रेस खेड स्थानकात थांबवण्यात आली आहे. तर सावंतवाडी- दिवा पँसेंजर दिवाणखवटी येथे जनशताब्दी व तेजस एक्स्प्रेस रत्नागिरीत व श्री गंगानगर एक्स्प्रेस कामथे स्थानकात थांबवून ठेवण्यात आली आहे.